maharashtra day, workers day, shivshahi news,

वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास कटिबद्ध - उ.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भावोद्गार
Deputy Chief Minister Devendra Fadnavis , solapur , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा , सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जगदिश कोरीमठ
आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली आहे.  मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य    करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.

 याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. 
वटवृक्ष मंदिरात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान
याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट,
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपअधिक्षक विलास यामावार, पी.आय. जितेंद्र कोळी, पी.आय. महेश स्वामी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी, गवंडी समाज अक्कलकोट तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी, उद्योगपती शैलेश राठौर, वैजूनाथ मुकडे, श्रीशैल गवंडी, माजी नगरसेवक यशवंत धोंगडे, रामचंद्र समाणे, राजाभाऊ झिंगाडे, ॲड.विजय हर्डीकर, मनोज इंगुले, संतोष कलबुर्गी, नितीन कटारे, शिवशंकर स्वामी, स्वप्निल गायकवाड, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !