आगामी निवडणुकांमध्ये लक्षणीय यश मिळवण्याचा निर्धार
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली असून, या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करण्यात आली आहे. यावेळी गाव तिथे शाखा, व एक बूथ, पाच यूथ ही रणनीती पक्षाने राबविण्याचे निश्चित केले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भुसारी पाटील यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय कार्यकर्ता विशेष बैठक सिंदखेडराजा येथे घेण्यात आली. या विशेष बैठकीला अतुलभाऊ भुसारी पाटील, सिंदखेडराजा विधानसभा प्रमुख कारभारी गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीला मार्गदर्शन करताना अतुल भुसारी पाटील म्हणाले की, आपण बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका कार्यकारणी, जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी, पंचायत समिती सर्कल कार्यकारणी, गाव तिथे शाखा, एक बूथ पाच युथ या पद्धतीने बांधणी करून सर्व आघाड्यांची कार्यकारणी मजबूत करणार नाही तोपर्यंत या देशातील प्रस्थापित पक्ष व सर्वसामान्य जनता तुमची राजकीय दखल घेणार नाहीत.
जिस समाज का दल नही उस समाज का बल नही. म्हणून रासप कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी कामाला लागून पक्ष बांधणी मजबूत करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय ताकद वाढवावी, असे जाहीर आव्हान केले. संतोष वनवे तालुकाध्यक्ष सिंदखेडराजा, अविनाश ठाकरे, उमेश तायडे, गौरव देशमुख, गणेश झोरे, प्रथमेश चित्तेकर आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते, असे रासपचे तालुका अध्यक्ष संतोष वनवे यांनी कळवले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा