स्मृतिदिन कार्यक्रमात दैनिक पुढारीचे संपादक हरीश पाटणे यांचे भावोद्गार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कादे)
बोपेगाव येथे कै.मा.खा.लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त बोपेगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करणेत आले. यावेळी दै.पुढारीचे संपादक श्री.हरीष पाटणे यांचीं प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हरीष पाटणे यांनी कै.मा.खा.लक्ष्मणराव पाटील यांच्या विषयी भावना व्यक्त करताना गोरगरीबाचे कैवारी,कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते होते. साताऱ्याचे पोलादी पुरूष,साताऱ्याचे सिंघम अशा अनेक पदव्या त्यांना लोकांंनी त्यांना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खामध्ये सामील होऊन समरस होण्याची कला त्यांचेकडे होती. अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिल्या. विठ्ठल शिंदे यांनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
या अभिवादन कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्य.बॅंकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव प्रताप आण्णा पवार, किसनवीर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रमोद शिंदे, मनोज पवार, उदयसिंह पिसाळ, महादेव मस्कर, शशिकांत पवार, मधुकर भोसले, अनिल जगताप, सत्यजीत वीर, कृष्णराव डेरे, किरण जाधव, प्रकाश आण्णा पाटील, बोपेगावचे नागरीक व वाई तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा