रखडलेली कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा अखेर संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील पहिली कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा चिंधवलीमध्ये सोमवार दि.22 रोजी संपन्न झाली. सातारा जिल्हा परिषद कुष्ठरोग विभाग, वाई पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत चिंधवली व जिल्हा परिषद शाळा चिंधवली, खडकी, भिवडी, चांदवडी, किसनविरनगर यांच्या संयुक्त सहभागाने ही स्पर्धा संपन्न झाली.
मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुले व मुली यांचा मोठा गट, मध्यम गट व छोटा गट असे गट तयार करण्यात आले होते. चिंधवली, खडकी, भिवडी, चांदवडी व किसनवीर येथील जिल्हा परिषद शाळेतील बहुसंख्य विध्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला दिसून आला. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी नेटके नियोजन करून स्पर्धा पार पाडली. विनायक चव्हाण, देवा कांबळे, शंभूराज निकम, श्रेया निकम, लक्ष्मी बोरकर, शुभ निकम, अनुष्का इथापे, जान्हवी शिंगटे, अर्जुन चव्हाण, पूर्वेश पोळ, यश राठोड, विघ्नेश इथापे, तन्मय माने, वरद जाधव, दुर्वा जाधव, ईश्वरी पवार, संस्कृती पवार या विध्यार्थी व विध्यर्थिनींनी मॅरेथॉन स्पर्धेत विशेष यश प्राप्त केले.
यावेळी डॉ. शीतल सावंत सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यक्रम सातारा, डॉ. संदीप यादव, तालुका आरोग्य अधिकारी वाई, डॉ. पंकज महाडिक, डॉ. आशालता निकम, डॉ. भगत समुदाय आरोग्य अधिकारी, श्री. साबळे कुष्टरोग सहाय्यक, चिंधवली गावच्या सरपंच शोभा चव्हाण, उपसरपंच विजय इथापे, चिंधवली विकास सेवा सोसायटी अध्यक्ष चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष नितीन इथापे, माजी अध्यक्ष शंकर इथापे, विजय गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयोजक मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा रखडलेली होती. सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांना ही गोष्ट समजल्यावर अगदी कमी कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्धार त्यांनी केला व सर्वाना सोबत घेऊन ही स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पार पडली. यात विशेष योगदान दिल्याबद्दल चिंधवली ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी व हितचिंतक यांचे विजय गायकवाड यांनी आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा