maharashtra day, workers day, shivshahi news,

भगिनींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो - चेअरमन अभिजीत पाटील

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे 'खेळ पैठणीचा' कार्यक्रम उत्साहात संपन्न
Khel Paithanicha' programme , Chairman Abhijit Patil , mangalwedha , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
'खेळ पैठणीचा' कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन 'विठ्ठल सहकारी'चे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने  'खेळ पैठणीचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बक्षीस वितरण समारंभात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले.... संसाराची जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरंगुळ्याचे आणि एकत्रित आनंदाचे काही तास मिळावे यासाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यास मिळणाऱ्या उस्फुर्त प्रतिसाद आणि सर्व वयोगटातील सहभाग यामुळे प्रत्येक गावात हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाला मरवडे येथे उस्फुर्त प्रतिसाद.. शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट संयोजनातून विलक्षण आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या सर्व खेळामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ.अश्विनी नागेश मोरे, व्दितीय सौ.मनिषा अतुल गवळी, तृतीय सायली बालाजी पवार, तर सौ. सुजाता दशरथ गणपाटील या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके अभिजीत पाटील यांनी वितरीत केली. कार्यक्रमाचे निवेदिका मोनिका जाजू यांनी केले.
यावेळी मरवडे येथील मा.सरपंच दादासाहेब पवार, सरपंच पुनम मासाळ, उपसरपंच दिक्षा शिवशरण,  इंडियन रेल्वे PSI, दामोदर घुले वस्ताद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस दादासाहेब भगरे,साहेबराव पवार सर, माजी विस्तार अधिकारी डॉ.माणिक पवार, प्राचार्य हेमंत वगरे, सुभाष भुसे सर, संभाजी रोंगे सर, अंबादास पवार सर, डॉ.अजित डांगे, सुभाष शिवशरण, निखिल कुलकर्णी, माळी सर, काशिद सर, गोविंद चौधरी, बसवराज येंडसे, रतीलाल केंगार, शहाजी पवार सर , श्रीकांत मेलगे, विलास काळे, समाधान जाधव (महाराज) यांच्यासह मरवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !