पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने श्री रामाचा जागर; पंढरी नगरी रंगली भगव्यात
शिवशाही वृत्तसेवा,पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दुसरीकडे देशाची दक्षिण काशी असलेल्या पंढरी नगरीत अयोध्येत राम मंदिर उभे राहिले यासाठी योगदान दिलेल्या कारसेवकांचा सपत्नीक संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन सन्मान मनसे व विठ्ठल परिवाराच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे व ज्येष्ठ नेते मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे श्री राम मूर्तीचे पूजन कारसेवेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या वतीने करण्यात आले तर आरती मनसे नेते दिलीप धोत्रे आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. फटाक्याची अतिषबाजी करत आणि पंढरी नगरीत आलेल्या भाविकांना व पंढरपूरकर नागरिकांना मिठाई वाटप करून तोंड गोड करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्येतील मंदिरात श्री राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने हा मोठा आनंदाचा क्षण असून याची प्रतीक्षा सर्व भारतीयांना होती असे सांगताना धोत्रे म्हणाले की, मी 1991 विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो तेेंव्हापासून या दिवसाची वाट पाहिली आहे. श्रीरामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यासाठी कारसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या मुळेच हा आनंदाचा दिवस पाहावयास मिळत असल्याचे उदगार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काढले. तसेच कारसेवकांचा संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन सपत्नीक सन्मान पंढरी नगरीत केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे वक्तव्य दिलीप धोत्रे यांनी केले.
अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना होत असल्याने हा सर्व देशवासियांसाठी आनंदाचा सण असून पंढरपूरकर सुद्धा या आंदोत्सवात सहभागी झाले असल्याचे दिसून आले. प्रभू श्रीराम मंदिर उभारणी आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वच कारसेवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सहपत्नी कुटुंबासह मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा आणि रामंदिर अक्षता सहसंयोजक प्राध्यापक संदीप सावेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख प्राध्यापक राजेश दंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, नगरसेवक लखन चौगुले, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक सतीश आप्पा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर,सुरज पेंडाल, मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, मंगळवेढा उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार,सांगोला तालुका अध्यक्ष अनिल केदार, महिला आघाडीच्या अध्यक्ष भारतीताई चौगुले, ज्योतीताई ओमने, रंजनताई इंगोले, साक्षी सुरवसे,विद्यार्थी सेनेचे अवधूत गडकरी, प्रताप भोसले, उद्योजक विकी चव्हाण, सुरज देवकर, आकाश कुलकर्णी, रोहन कोकरे, शहाजी शिंदे,शाम गोगाव, अमोल आटकळे, माऊली गांडुळे, उमेश वाघोलीकर शहर व तालुक्यातील सर्व कारसेवक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा