maharashtra day, workers day, shivshahi news,

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता

पंढरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीची हत्तीवरून मिरवणूक
Granthraj Dnyaneshwari Parayan ceremony , Akhand Harinam Week concludes , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता हत्तीवर ग्रंथ ठेवून मोठ्या उत्साहात पार पडला.

चारोधाम यात्रा संकल्प परिपुर्ती, गुरुवर्य वै. दत्तात्रय महाराज बडवे यांचे महानिर्वाण त्रितपपुर्ती व गुरुवर्य प्रसाद महाराज बडवे यांचे सेवा त्रितपपुर्ती या निमित्त श्री विठ्ठल मंदिर नदिवेस, मिरज येथील सर्व वारकरी भाविकांच्या वतीने सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 
सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शंकर महाराज बडवे, बाबासाहेब बडवे, ह.भ.प.विजय पांडुरंग कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान सप्ताहाच्या सांगता समारंभा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीची हत्तीवरून मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रसाद महाराज बडवे यांनी आपल्या मस्तकावर श्री ज्ञानेश्वरी ठेवली होती.

सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.उत्तम मिरजकर यांनी केले तर सप्ताहात ह.भ.प.बाळासाहेब देहूकर, ह.भ.प.एकनाथ पिंपळनेरकर, ह.भ.प. हरिभाऊ महाराज बोराटे-आजरेकर, ह.भ.प. केशव नामदास, ह.भ.प. चैतन्य वासकर, ह.भ.प. भागवत शिरवळकर यांनी किर्तनसेवा केली. या सोहळ्याला वै. धोंडोपंत दादा फडावरील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 
aaaa
या सोहळ्यासाठी बाळकृष्ण येसुमाळी, महादेव भोसले, सोपान येसुमाळी, हरिसिंग रजपूत, शिवाजी भोसले, शशिकांत चौगुले, दीपक चंदगुडे, रत्नाकर भोसले, शेषराज पाटील, विश्वास सावंत, गणपती माने, सुलोचना सावंत, सुखदेव पवार, सर्जेराव पवार आदींनी परिश्रम घेतले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !