डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केले अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांनी प्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांच्यासह पंजाब गायकवाड, सुनिता इंगोले, प्रदीप आंधळे, गणेश ठोके, मारुती सोलापूरे, अन्वर शेख, प्रमोद सोनवणे, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा