राजमाता जिजाऊ वेशभुषेतील मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्रावर टाकला प्रकाश
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ वेशभुषेतील मुलींनी यासह उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला.
शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळयास व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीं शिवम बोचरे, कु.अंकिता लोथे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. कु.जिजाऊ कर्हाळे या विद्यार्थींनीने राजमाता जिजाऊ बोलते या भुमिकेत जिजाऊच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला.
यावेळी त्यांना मुख्याध्यापक डॉ.प्रकाश अंभोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी प्रा.सुधाकर इंगोले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या जयंती उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खा.ऍड.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, समिती सचिव त्र्यंबकराव लोंढे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, कल्याण देशमुख, विक्रम जावळे, प्रा.सुधाकर इंगोले, कांताताई कल्याणकर, सुनिताताई मुळे, जयाताई पवार, मालतीताई कोरडे, संगिताताई वायचाळ, शिवाजीराव पवार, मनिष आखरे, माधव कोरडे, अमोल देशमुख, राजकुमार वायचाळ, गजानन पाटील, ऍड.दिलीप भाकरे, नामदेव कोरडे, श्रीकांत पाटील, मदन शेळके, पुंजारामजी जाधव यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, जिजाऊ बिग्रेड, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक, महिला भगिंनी मोठया संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा