खिचडी शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आपले घर कसे चालवावे
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मागील वीस वर्षांपासून शालेय पोषण आहार खिचडी शिजवण्याचे काम करीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना केवळ 2500 रू मानधन देण्यात येत आहे. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून केवळ 2500 रू मानधन येत आहे. त्यामुळे खिचडी शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आपले घर कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे.
महिला खिचडी शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी 10 हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर, कुंतलाबाई पाईकराव, पंचशीला ढोके, सुनिता भालेराव, सखुबाई ढोंबरे, ताई खंदारे, शांताबाई खंदारे, पत्रकार शांताबाई मोरे, यांच्या मोठ्या संख्येने खिचडी शिजवणाऱ्या महिला भगिनी उपस्थित होत्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा