बँकेकडून कर्ज घेऊन महिलांनी सुरू केले विविध व्यवसाय
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत एकूण 23 गावातील महिला बचत गटांनी नारीशक्ती महिला प्रभाग संघाची स्थापना केली . ह्या प्रभाग संघामध्ये एकूण 23 गावातील २३ ग्राम संघाचे जोडणी करण्यात आले असून ह्या ग्रामसंघा अंतर्गत गावागावात 50 60 गटाची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सदर बचत गटाची स्थापना करून त्यांना प्रोत्साहन पर 15000 अनुदान खेळते भांडवल देण्यात आले. त्याच भांडवलातून काही महिलांनी स्वतःचा व्यवसाय व काही गटांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज रोजी कुंटूर परिसरातील महिलांनी आपल्या व्यवसाय उभे केले सुरुवात केली असून आपल्या परिवाराचा गाडा चांगला प्रकारे चालवण्याचा आर्थिक पाठबळ देण्यात सुरुवात केली आहे .
त्यामध्ये कुंटूर येथील सैलानी महिला बचत गटाच्या महिलांनी जनरल स्टोअर टाकून आपल्या दुकानाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचबरोबर पिठाची गिरणी बोटव्याची मशीन संजीवनी महिला बचत गटातील यांनी सुरू केले आहे . तसेच शेळ्या मेंढ्या गाई म्हशी दूध व्यवसाय व उत्कृष्ट रित्या मेंढ्या पालन व्यवसाय सुरू झाला असून त्याच मेंढ्याच्या केसापासून घोंगडी ही उत्पादन कुंटूर मध्ये एक नंबर होत आहे.
त्याच घोडीला आज महाराष्ट्रभर मागणी असून बचत गटाचे चळवळ कुंटूर मध्ये जोरात सुरू असल्याची माहिती रेखाताई अनिल कांबळे समुह संसाधन व्यक्ती यांनी सांगितले आहे .
नायगाव तालुक्यातील पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसआरएल विभागातील मल्लेश येडके ,बाबू डोळे ,ईरवंत सूर्यकार, ह्या अधिकाऱ्यांनी बचत गटाला वेळोवेळी भेट देऊन कामाचा दर्जा व विविध व्यवसाय सुरू करून आपल्या उदरनिर्वाह चालवावा अशी माहिती दिली .
त्यानंतर गावातील समुह संसाधन व्यक्ती व मास्टर सीआरपी म्हणून रेखाताई कांबळे यांनी परिसरातील गटाला चांगल्या प्रकारे उद्योग विषयाची माहिती दिल्याने एकमेका साह्य करून असे बचत गटांनी सुरुवात केली असून बँकेकडून हे कर्ज घेऊन आपल्या व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा