कामे निकृष्ट दर्जाची, चौकशीसाठी अभियंता येत नाहीत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामधील शासकीय कामे चालू आहेत . त्यातील कामासाठी नियमाप्रमाणे वाळू सिमेंट चांगल्या दर्जाचे असल्यानंतरच कामे चांगली होतील असा समज असला तरीही गुत्तेदार आपल्या पद्धतीने कामे करत आहेत .
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामासाठी 51 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र ह्या कामासाठी चुरीचा वापर करून कामे चालू असून शासकीय दवाखान्याचे ही कॉटर पोस्टमार्टम रूम कंपाउंड वॉल हे चालू असून बंधारे त्याचबरोबर सी सी रस्त्याचे विविध कामे चालू असून सदर कामांमध्ये रेतीएवजी शिलकोट टाकून कामे पूर्ण करण्यात येत असून सिमेंट कमी आहे .
दर्जाहीन कामे होत आहेत. मात्र याकडे गुत्तेदार व शासकीय अधिकारी कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. सदर कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही नागरिकातून होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा