आदमपूर शालेय व्यवस्थापन समितीकडून जिल्हा परिषद शाळेस एलईडी टीव्ही व फॅन भेट

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने केले सहकार्य
Gift of LED TV and Fan to Zilla Parishad School , Adampur , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आदमपूर: बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळेस शाळेवर कार्यरत असलेल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भुरे व उपाध्यक्ष बाळू डोंपे यांनी स्वखर्चातून या शाळेस एलईडी टीव्ही सह सिलिंग फॅनची भेटवस्तू दिले आहेत.

आदमपूर येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यांना शिकवण्यासाठी एका मुख्याध्यापकासह ९ सहशिक्षक आहेत. शाळेमध्ये असलेले संगणक वर्ग बऱ्याच दिवसापासून धुळखात पडले असल्यामुळे शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन यूट्यूब द्वारे शिक्षण देण्यासाठी कुठलेच पर्याय नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था शोधत नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश भुरे व उपाध्यक्ष बाळू डोंपे यांनी स्वतः पदर मोड करीत स्वखर्चातून एक एलईडी टीव्ही खरेदी करून शाळेत भेट दिली. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना उखाड्याचा सामना करावे लागू नये म्हणून प्रत्येक वर्गात सिलिंग फॅन भेट दिले आहेत. त्यांनी या दिलेल्या विद्यार्थी उपयोगी व मौल्यवान भेट वस्तूचे मुख्याध्यापक, सहशिक्षक-सहशिक्षिका सह संपूर्ण विद्यार्थी व पालकातून भेटवस्तू देणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भुरे व बाळू डोंपे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

गावकऱ्यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माझी व उपाध्यक्षपदी बाळू डोंपे यांची बिनविरोध निवड करून आम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येथील कार्यरत असणारे सर्व शिक्षकांशी समन्वय साधत आमची शाळा व आमच्या शाळेतील विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काही दिवसात गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व वर्ग डिजिटल व प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही बसवण्याचा मानस आहे. यासाठी संपूर्ण शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन सह मदत करण्याची आवश्यकता आहे. असे आदमपूर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भुरे, यांनी सांगितले. 

---------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !