मोठ्या प्रमाणात छावा सैनिक मातृतिर्थावर दाखल
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधि आरिफ शेख)
देऊळगांव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगांव राजा, सिदखेडराजा, व किनगांव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ते बंद करून संबंधित बिट जमदारवर कारवाई करण्यासाठी आज तारीख 25 डिसेबर रोजी दुपारी 12वाजता सिंदखेडराजा येथील छत्रपती शिवाजीनगर टी पाँईट जवळ छावा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात छावा सैनिक मातृतिर्थावर सकाळी दाखल झाले होते दुपारी 12 वाजता झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी जयघोषात रस्ता रोको करण्यात आला.
रस्ता रोको करण्यासाठी गोविंदराव टेके बाळासाहेब शेळके संजय ऊगले शंकर शिंदे अमोल काकडे बजरंग काळे सुदामराव कळकुंबे नारायण म्हस्के अर्जुन जाधव राहुल काकडे सखाराम एखंडे संजय राऊत प्रल्हाद राठोड समाधान काकडे बबन जाधव वीनायक राठोड डीगांबर शिंदे दिलीप राठोड बाजिराव हरने आदी उपस्थित होते शेवटी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यात आला.
पोलिस प्रशासनाने अवैध धंदे बंद न केल्यास गृहमंत्र्यांना भेटून न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी बोलताना दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा