ग्राहक हक्क व संरक्षण बाबत माहितीपर संबोधन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 28 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी 4.00 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्राहक हक्क व संरक्षण बाबत माहितीपर संबोधन आयोजित करण्यात आला आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दि. 20 जुलै, 2019 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानिमित्त 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमामध्ये संबंधित शासकीय अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय प्रतिनिधी, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील जिल्ह्याशी संबंधित अशासकीय प्रतिनिधी, ग्राहक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, लोकप्रतिनिधी तसेच ग्राहक कल्याण क्षेत्राशी संबंधित इतर मान्यवर यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा