कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम रूमचे काम शिलकोटने , कंपाउंड वॉल, वाहनतळ व पीएम रूमचे काम केले शिलकोट मध्ये दगडाचे पावडर असते, वापरून सदर कामे केल्याने दवाखाना ही गळतीला लागला होता त्याचप्रमाणे पिएम रुमहि गळेल, 66 लाख रुपये मंजूर झालेल्या पीएम रूम व दोन वाहनतळ व कंपाउंड वॉल फेवर ब्लॉक असे काम घेण्यात आले होते या कामात मध्ये गुत्तेदाराने रेती न वापरता शीलकोट वापरून काम केल्याने भिंतीही शिलकोट मध्येच बनवल्या व त्यावर रेतीने प्लास्टर केले यामुळे सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असून याचा परिणाम काही दिवसातच बघायला मिळेल अशी परिस्थिती कुंटूर येथील कामाची होत आहे. चार कोटी खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम केल्यानंतर ताब्यात घेण्याच्या अगोदरच हा दवाखान्यात गळायला लागला त्याचप्रमाणे वाहन तळे व पीएम रूमचे चार रूमचे काम मात्र गळायला लागेल व त्यांच्या भिंतीही काही दिवस टिकेल की नाही याचा भरोसा नागरिकांना राहिला नाही.
शिलकोट म्हणजे माती मिश्रित पावडरने बांधकाम केल्याने सदर पाणी चा निचरा होत नाही व पाणी शोषून घेतल्यामुळे पाणी आत मध्ये पाजरतोय त्यामुळे कोणतीही पिलर असो भिंत असो या स्लॅब चे काम हे निकृष्ट होणार असे समीकरण असतानाही काही बुद्धिमान इंजिनियरने सीलकोट वापरल्याने भिंती मजबूत होतात व तसे गोरमेंट परवानगीच दिली आहे . असे सांगून सदर गुत्तेदारांना शिलकोटच वापरा व चांगले कामे करा असे आदेश दिले असल्याचे गुत्तेदार पवार यांनी सांगितले त्यामुळे शिलकोट काम करून निकृष्ट दर्जाचे कामे करून 66 लाख रुपयांचा निधी अर्ध्या मध्ये काम कसे होईल याकडे गुत्तेदाराचे लक्ष असून चांगले कामे करत नसल्याने कुंटूर मध्ये मात्र निकृष्ट कामाचा पायंडा पडला की काय अशी परिस्थिती नागरिकांतून चर्चा होत आहे . सदर कामाची चौकशी इंजिनियर मार्फत करून शिलकोट का वापरले याची तपासणी करण्यात यावी व त्यांची परवाना दिल्या कोणी ती परवानगी दाखवून सदर काम दहा वर्षात जर गळू लागले तर याची भरपाई गुत्तेदाराकडून घेण्यात यावी अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा