धनंज येथील नदीतून अवैध रेती उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे धनंज येथील नदीपात्रामध्ये काही दिवसापासून ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरवर गुडगुडी बसवून नदीपात्रातून झुल्याच्या साह्याने रेती उपसा करून इतरत्र बाजारात विक्री करण्यासाठी काही झुंड तयार झाले होते . त्यावेळी सर्व दोन-तीन दिवसापासून रेती काढत असताना अचानक रात्री दोनच्या सुमारास तहसीलदार मंजुषा भगत यांनी धाड टाकली या धाडीमध्ये ट्रॅक्टर मिळाला असून एक टिप्पर व जेसीबी पळून गेले . ट्रॅक्टर तर रस्त्यातच वाळू टाकून भर वेगात धावत सुटले त्यामुळे ट्रॅक्टर व टिप्पर पळुन गेले. ट्रॅक्टरवर असलेले गुडगुडी मिळून आल्याने तहसीलदार मंजुषा भगत व सहायक पोलीस निरीक्षक यांनी सदर गुडगुडीचा ट्रॅक्टर कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये आणून जप्त करण्यात आला पुढील कारवाई करण्यासाठी तहसीलदार मंजुषा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी हे जाऊन पंचनामा करून सदर माहिती देतील असे सांगितले.
दिवाळी असल्याने तलाठी व मंडळाधिकारी हे सुट्टीवर आहेत .त्यामुळे त्यांनी आल्यानंतर पंचनामा होऊन नदीपात्रातून रेती काढत असलेल्या काही अवैध रेती चोरावर कारवाईक होणार आहे. तहसीलदार मंजुषा भगत यांनी दिवाळीचा सण असतानाही सुट्टीवर असूनही रात्रीच्या वेळी अचानक माहिती मिळाल्यानंतर धाड टाकल्यामुळे परिसरातील रेती चोरांचे धाबे चांगले दणाआणले आहे अशी चर्चा जोरदार सुरू आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा