आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने पिंपळगाव (मिश्री) येथे जिल्हा व तालुका स्तरीय पदाधिकारी नियुक्ती व उद्घाटन सोहळा

१८ नोव्हेंबरला होणार उदघाटन व तालुका स्तरीय पदाधिकारी नियुक्ती  सोहळा
Taluka level office bearers appointment ceremony , Warkari family , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥
एखादे कर्म करण्याचा संकल्प मनामध्ये केला की तो संकल्प वाणी द्वारा प्रगट करण्याचे व तो संकल्प सिद्धीस नेण्याचे कार्य ईश्वरच करतो..या न्यायाने आम्ही वारकरी परिवार नांदेड या परिवारातील सर्वांचे स्वप्न आज  साकार झाले...अर्थात 'आम्ही वारकरी' चे "आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य" या नावे आपली शासन दरबारी नोंद झाली त्या संस्थेचे उद्घाटन सोहळा व जिल्हा व तालुका स्थरीय नियुक्ती वितरण पिंपळगाव (मिश्री)ता. नांदेड येथे दि.१८नोव्हे.२०२३ रोजी सकाळी ११ वाजता  उदघाटन सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे.


         दि.१३.०२.२०१६ पासून आपण हा 'आम्ही वारकरी' नावाचा ग्रुप चालवत आहोत.. या ग्रुपचे उद्दिष्ट म्हणजे परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करणे हाच होता,आहे आणि तो राहणार आहे.. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये विचार होता की आपल्या ग्रुपला कायदेशीर महत्त्व प्राप्त व्हावे.. आणि आपल्या ग्रुपचे एका सेवाभावी संस्थेमध्ये रूपांतर व्हावे.. जेणेकरून वारकऱ्यांच्या व इतर सर्व संप्रदायातील परमार्थ प्रेमी व्यक्तींच्या न्यायासाठी व हक्कासाठी लढता येईल... यासाठी शासन दरबारी आपली नोंद होणे आवश्यक होते.. म्हणून गतवर्षी पासून आपण आपल्या या परिवाराला सेवाभावी संस्थेचे रूप देण्यासाठी कार्य करत होतो. 

त्या कार्यास आज रोजी पूर्णत्व प्राप्त झाले आहे.आपल्या संस्थेचा उद्घाटन सोहळा व जिल्हास्तरिय, तालुकानिहाय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांची नियुक्ती केली जाणार आहे.. सर्वांना नियुक्ती प्रमाणपत्र उद्घघाटनाच्या दिवशी दिले जाणार आहेत.निवड झालेल्या पदाधिकाऱ्याना आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणती कामे करावीत याबाबत उद्घाटनाच्या दिवशी सर्वांनी आपापले मत मांडावेत. आपले प्रेम, आपला आशीर्वाद आणि आपले सहकार्य सदैव सोबत राहू द्या.. सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन राम महाराज पांगरिकर, व्यंकटराव जाधव,प्रभाकर पुय्यड,गंगाधराव हंबर्डे, शिवहार मंदमवाड,ईत्यादीने केले आहे
    असे प्रसिध्दीपत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड प्रसिध्दी प्रमुख यांनी दिले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !