सरकार कडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न - रविकांत तुपकर
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन व कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी २० नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढला होता त्यावेळी तुपकर म्हणाले होते जर ८ दिवसात सोयाबीन व कापसाला चांगला भाव मिळाला नाही तर २९ नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणार असा इशारा त्यांनी दिला होता याच आंदोलनाची धास्ती घेऊन प्रतिबंधक कारवाईचे कारण पुढे करून त्यांना काल राहत्या घरून अटक केली होती पण संध्याकाळी जामीन मंजूर झाला आणि आजपासून सरकारच्या दडपशाही विरोधात त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून सोमठाना येथून आज अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा