maharashtra day, workers day, shivshahi news,

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या महाआरोग्य शिबिरात रुग्णांना जीवदान

गंभीर रुग्णांना मिळाल्या तातडीने आरोग्य सुविधा
Health is at the door of Pandhari , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
कार्तिकी एकादशीच्या रात्री बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून श्री विश्वंभर वाघमारे नावाच्या 76 वर्षाच्या वयोवृद्ध पुरुषाला छातीत वेदना होत असल्याच्या तक्रार होती. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे आणण्यात आले जेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे- तसेच उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले.

स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शनने त्याला ताबडतोब थ्रोम्बोलायझेशन (रक्तवाहिनी मधील गुठळी वीतळविणे) करण्यात आले.
रुग्णांची लक्षणे कमी झाली, त्याचे जीवनावश्यक चीन्हे स्थिर झाली.सद्यस्थितीत रुग्णाची प्रकृती चांगली आहे आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील डॉक्टर, सिस्टर,आणि कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल रूग्ण आणि त्याचा मुलगा यांनी आभार मानले.
श्रीमती फसुबाई ठाले नावाच्या 55 वर्षीय महिला भिवंडी, मुंबई येथून कार्कीती एकादशीसाठी आल्या होत्या. त्यांना श्वासोच्छवास, छातीत दुखणे आणि चक्कर येणे अशा तक्रारींसह उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे अपघात विभागात आल्या होत्या. तीथे तात्काळ आपली वैद्यकीय टीम हजर झाली आणि त्यांचे हार्ट फेल्युअर (तीव्र स्वरूपचा हृदयविकाराचा झटका) चे निदान झाले. स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शनने तिला कालांतराने थ्रोम्बोलायझेशन (रक्तवाहिनी मधील गुठळी वीतळविणे) केले गेले. रुग्णाचे बारकाईने निरीक्षण करुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयातील आय सी यू मधे दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती सुधारली असून स्थिर आहे.

सुधीर केसरकर 34 वर्षीय पुरुष हे डाव्या वरच्या अंगाच्या कमकुवतपणाच्या तक्रारी आणि फेफरे (फिट) ची तक्रार घेऊन उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर अपघात /तातडीच्या विभागात आला. तात्काळ त्यांचा मेंदुचा सीटी स्कैन करण्यात आला ज्यामध्ये मेंदुमधे रक्तस्राव होऊन गुठळी (ब्रेन स्ट्रोक) झाल्याचे दिसून आले. रुग्णाला तात्काळ योग्य उपचार दिले गेले.
रुग्णाची प्रकृति स्थिर झाली आणि त्याच्या फेफरे(फिट नियंत्रित केले गेले.

हे तीनही रुग्ण काल कार्तिकी एकादशीला आले होते. आम्ही दैनंदिन आधारावर अनेक गुंतागुंतीची प्रकरणे व्यवस्थितरित्या हाताळत आहोत, विशेषत: गेल्या 15 दिवसांत, कार्तिकी वारीच्या तोंडावर रुग्णांचा ओघ वाढला आहे. यातील बहुतांश रुग्ण गरीब आहेत, वारीसाठी सोबत कोणी नसलेले आहेत.
आम्ही 50 - 60% ऑक्सिजन लेवल असलेले COPD सारखे , गंभीर आजार तसेच डिहाइड्रेशन सह तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, प्लेटलेट संख्या 20 हजारांपेक्षा कमी असलेले डेंग्यू सारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचे यशस्वीरित्या विशेषतः शून्य मृत्युदर ठेऊन उपचार केले आहेत.

ही सर्व प्रकरणे उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे डॉ. जागृती पालव, डॉ. शिवम गोयल, डॉ. प्रशांत खरात मेडिसीन तदन्य यांनी डॉ. कुलदीप कोलपकवार (डीएम कार्डिओलॉजी) यांच्या तसेच डॉ राधाकिशन पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे ,डॉ सुहास माने जिल्हा शल्य चिकित्सक सोलापुर ,डॉ. जयश्री ढवळे वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या हाताळली आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !