सोयगाव तालुक्यामध्ये खरिप पिकांचे क्षेत्र खरांब झाल्यामुळे दुष्काळ जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा तसेच देव्हारी, पिंपळवाडी,चारू,हिवरी अशा अनेक पाझर तलाव व धरण क्षेत्रात दुष्काळ जाहीर केल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आले
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात दुष्काळ नुकसानाचे पंचनामे पुर्ण झाले आहेत तालुक्यात शंभर टक्के खरिप पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याचे आढळले अहवाल दुष्काळाचा सर्वेक्षण अहवाल कृषी खात्याच्या विविध पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे या अनुषंगाने सावळदबारा सह देव्हारी, पिंपळवाडी, चारू,हिवरी, अशा अनेक पाझर तलाव व धरण क्षेत्रातील वीजवितरण व पाटबंधारे विभागाच्या वतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे खरिपच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी पाऊसामुळे सावळदबारा क्षेत्रामधिल बर्याच पाझर तलाव व धरणात 70 ते 80 टक्के पाणी साठा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग पिकाची लागवड केली होती.
असे असताना शेतकऱ्यांना कोणतीही सूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता मोटारीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले अशा या शेतकऱ्याच्या जिवावर खरिप मध्ये निसर्ग कोपला आणि रब्बी मध्ये विद्युत पुरवठा अधिकारी कोपले अशा परिस्थित शेतकऱ्याला रब्बी हंगामातील गहू हरभरा भुईमूग अशा पेरलेल्या पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान होत आहे वीजपुरवठा खंडित केल्याने दोन महिन्या च्या झालेल्या या पिकांना दोन पाणी दिल्यावर वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कि खरिपाचे पिंके तर गेली आता शासनाच्या कारवाईमुळे रब्बी हंगाम सुधा गेले या रब्बी हंगामातील गहू हरभरा भुईमूग याही पिकांचे पंचनामे करून याची नुकसान भरपाई शासनाने करून देण्यात यावी किंवा जानेवारी पर्यंत धरणं क्षेत्रातील वीजपुरवठा 25 नोव्हेंबर पर्यंत वीज कनेक्शन जोडुन देणे नाही जोडल्यास आम्ही सर्व शेतकरी याच धरणामध्ये जलसमाधी घेऊ अशी संताप जनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा