हरभरा पिकातील सोयाबीन काढताना शेतकऱ्यांची दमछाक
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी जालना मूस्तफा खान पठाण
भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात हरभऱ्याच्या पिकात सोयाबीन उगवली आहे. ती काढताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह सोयाबीन काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा धावडा परिसरात जोरदार आहे पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीनसह कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयबीनची सोंगणी केली, तेव्हा मोठ्या प्रमाणात दाणे जमिनीवर पडले. त्यातच शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी झाली; परंतु हरभऱ्यापेक्षा जास्त सोयबीन उगवली
. ही सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर देखील मिळत नाही. सोयाबीनमुळे हरभरा आणि मक्याची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोळपणी देखील करता आली नाही. दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. कुटुंबाला सोबत घेऊन सोयाबीनची काढणी करावी लागत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा