कार्तिकी एकादशी निमित्ताने जागर हरिनामाचा कार्यक्रम आयोजित
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कार्तिकी एकादशी निमित्ताने जागर हरिनामाचा या कार्यक्रमा अंतर्गत नायगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर जुनेगाव येथे सुप्रसिद्ध किर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प. प्रभाकर महाराज पुयड यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी प्रमाणे नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने आयोजित जागर हरीनामाचा या कीर्तन सेवेचे आयोजन नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या विशेष प्रसिद्धी सेवा सहकार्याने करण्यात येते.
पारंपरिक या किर्तन सेवेसाठी यंदा परिसरातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य किर्तनकार ह.भ.प. प्रभाकर महाराज पुयड यांच्या कीर्तनाचे आयोजन दि 23 नोव्हेंबर रोज गुरूवारी रात्री ठीक ०८:0० वाजता शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर नायगाव येथे करण्यात आले असून या कीर्तन सोहळ्यात परिसरातील नामवंत व सर्वगुण संपन्न कलाकारांची साथ असणार असून यात बाळासाहेब पांडे, बाबुरावजी लंगडापुरे, गायनाचार्य प्रा. बिरादार सर, प्रा. माधव किनाळकर, माधव अप्पा नंदगावकर, नामदेवजी पांचाळ, स्वरगंगा संगीत संचाचे गणेशजी हाके, मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, बालाजी चौधरी, ह.भ.प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर, शि.भ.प. बालाजी भोस्कर, विकासजी भूरे, चंद्रकांत आमलापूरे, गायनाचार्य रमेश पाटील जाधव, सुभाष पाटील शिंपाळे, साईनाथ पाटील शिंपाळे, मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, मारोती नकाते, बासरीवादक विजय द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर बैस, तबलावादक हरीप्रसाद पांडे, प्रा. वसंत माने सर, दिलीप पाटील चव्हाण, अशोक चव्हाण, शंकर अप्पा बेळगे, होळकर मामा, सदाशिव मदेवाड, वाल्मिक मदेवाड, शिवा महाराज, लक्ष्मण पाटील कल्याण आदींसह परिसरातील गुणी कलावंत यांची साथ संगत लाभणार असून या किर्तन सेवेचा परिसरातील भाविकभक्तांनी लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवार नायगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा