maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबीरामध्ये ७४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
MLA Sadhan Awatade's birthday various social activities, 747 blood donors donated blood in blood donation camp, shivshahi news, mangalwedha, pandharpur,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरामध्ये ७४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते स्व. महादेवराव आवताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
रक्तदान हे श्रेष्ठदान हा मनी वसा बाळगून अखंड सेवाभावी वृत्तीने रक्तदान करणार्‍या अनेक अनामिक रक्तदात्यांमुळे कित्येक जीवांचे प्राण वाचण्यास मदत होते. असेच सामाजिक दायित्वाचे भान राखत आपण पाणीदार आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भेट देऊन अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक दायित्व जपण्याकरिता आपला सहभाग नोंदवला. त्याचबरोबर या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची काही जोडप्यांनी नोंद करून या विवाह सोहळ्यात आपला विवाह करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी पशुवैद्यकीय विभागामार्फत पशु आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून अनेक पशुधनांची तपासणी व उपचार करण्यात आले. 
यावेळी माजी पं. स सदस्य नवनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती धनंजय पाटील, दत्तात्रय जमदाडे, व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, संतोष मोगले, माजी संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, संचालक तानाजी काकडे, जगन्नाथ रेवे, माजी नगरसेवक कैलास कोळी, दादासाहेब ओमणे, दादा दोलतोडे, भारत निकम, विजय माने, भारत आटकळे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, शाम पवार, कार्यकारी संचालक मोहन पिसे, सिद्धेश्वर दत्तु, युवराज शिंदे, राजकुमार यादव, सुधाकर मासाळ, विनायक यादव, सतिश पवार, शिवाजी पटाप, सुदर्शन यादव, जनार्धन कोंडुभैरी, सुरेश मेटकरी, समाधान हेंबाडे, साहेबराव उगाडे, दत्ता साबणे, आदी मान्यवर, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन संचालक, एस एम अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनी, आवताडे शुगर, आवताडे स्पिनर्स या व्यावसायिक संकुलातील अधिकारी, कर्मचारी, आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर मंगळवेढा स्टाफ, ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दोन्ही तालुक्याच्या विविध गावातील ग्रामस्थ व नागरिक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी सिविल हॉस्पिटल सोलापूर येथील रक्तपेढीचे आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सद्य काळात रक्ताचा फार मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताचे नितांत गरज असताना आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर संपन्न झाल्याने सदर हॉस्पिटल मधील रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मोठी मदत झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकृतीचे विशेष कौतुक व कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !