अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्याने शेतकरी मानसिक रित्या कोलमडून पडला
आरिफ शेख /तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा शिवशाही न्यूज
सिंदखेडराजा तालुक्यात रविवारी रात्री गारपीट आणी अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी मानसिक रित्या कोलमडून पडला असुन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची घोषणा महाराष्ट्र शासनाने करने आणी तात्काळ पंचणाम्यांचे आदेश देणे आवश्यक आहे.
शेडनेट धारक शेतकरी, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, फुलशेती, भाजीपाला उत्पादक बागायतदार तसेच सर्वच रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचबरोबर खरिप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कपाशीच्या व तुरीच्या नगदी पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मजूर मिळत नसल्याने कपाशीची वेचणी ही संथ गतीने चालू होती मात्र रविवारी रात्री 10,30ते सकाळी 6वाजेच्या दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या ताटातील घास मात्र निसर्गाने हिरावला आहे झालेल्या या अवकाळी पाऊस ,गारपीट वादळी वाऱ्याने कपाशी व तूर ही पिके काही ठिकाणी लवंडली तर काही ठिकाणी मात्र जमीनदोस्त झाली असल्याने वेचणीस आलेला पांढरा शुभ्र कापूस हा पूर्णपणे खाली पडून मातीत मिसळला आहे पळसखेड चक्का, शिवणी टाका,माळसावरगांव, किनगावराजा,पांगरी उगले,उमरद,जांभोरा,रुम्हणा, सोनोशी, राहेरी खुर्द,राहेरी बुद्रुक,हिवरखेड पूर्णा, विझोरा ,निमगाव वायाळ, साठेगाव, पिंपळगाव लेंडी, शेलगाव राऊत,सावखेड तेजन यासह असंख्य गावात झालेल्या या गारपीट आणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची तोंडी आलेला घास मात्र हिरावला आहे
सदर घटनेची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार शशिकांत खेडेकर, आमदार डाँ शिगणे यांनी पळसखेड चक्का येथे शेतकर्यांचा शेतावर भेट देऊन शे नेट नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा