पळवे खुर्द येथे श्री काळभैरवनाथ जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
ह भ प प.पू. वै. रामदास महाराज साबळे यांचे कृपाशीर्वादाने तसेच खुर्द गावचे भूषण ह भ प सोमनाथ महाराज बारगळ यांच्या मार्गदर्शनाने तसेच सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प शिवानंद महाराज नांगरे यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द,पळवे बुद्रुक यांच्या सहकार्याने मंगळवार दि. 28 / ते मंगळवार दिनांक 6 पर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहणार आहे श्री काळभैरवनाथ मंदिर पळवे खुर्द या ठिकाणी पहाटे चार ते सहा वाजता काकडा आरती सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते बारा गाथा भजन, सायंकाळी पाच ते सहा वाजता हरिपाठ, सात ते नऊ हरी किर्तन नऊ नंतर हरी जागर भजन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .
हे सप्ताहाचे बारावे वर्ष आहे. मंगळवार दिनांक 28 रोजी ह भ प सोपान महाराज सानप, (शास्त्री हिंगोली ) बुधवार दिनांक 29 रोजी ह भ प सौ.प्रांजल ताई पानसरे (जुन्नर) गुरुवार दि. 30 रोजी ह भ प महेश आप्पा महाराज ) (आळंदी देवाची ) शुक्रवार दि. 1 रोजी ह भ प अश्विनीताई म्हात्रे( संगमनेर) शनिवार दि. 2 रोजी ह भ प माऊली महाराज कोठुळे (धर्मभूषण भिवंडीकर ) रविवार दि. 3 रोजी ह भ प किशोर महाराज कोकाटे (आळंदी देवाची ) सोमवार दि. 4 रोजी ह भ प विकास महाराज देवडे (किर्तन केसरी कर्जत ) मंगळवार दि.5 रोजी विलास महाराज मदने (आनंद भूषण राहुरी ) बुधवार दि.6 रोजी ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील( आवाजाचे जादूगार बुलढाणा ) यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे. या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने दररोज भाविक भक्त उपस्थित राहत असतात. तसेच चहापाणी ठरलेल्या अन्नदात्यांचे महाप्रसादाचे दररोज अन्नदान होणार आहे तसेच लाईट मंडप डेकोरेशन व्यवस्था पार्किंग व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत आप्पा देशमुख यांनी दिली..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा