संघटनेचे 8 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
ग्रामपंचायत स्तरावर लेखे ऑनलाईन करून गावाकऱ्यांना विविध दाखले देणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून मागण्या मान्य होई पर्यंत विविध आंदोलन होणार असल्याचे निवेदणाद्वारे कळवले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलेल्या निवेदनात संगणक परिचालकांवरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याया विरोधात वं संगणक परिचालकाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात मागण्या पूर्ण होई पर्यंत बेमुदत काम बंद व विविध आंदोलन पुकारत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
संगणक परिचालकाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे, महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचलकांचा आकृतिबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे, आकृती बंधात समाविष्ठ करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक 20 हजारपर्यंत वेतन सध्यस्तितीत देण्यात यावे, नियम बाह्य कामे लावताना संदर्भीय पत्रानव्ये ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा, सध्यस्तिथीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
संघटनेचे 8 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू असून 20 नोव्हेंबर रोजी जिल्यातील पंचायत समिती कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले तर 28 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावर शासनाने निर्णय न दिल्यास 4 डिसेंबर रोजी विधानसभा सदस्य यांच्या निवासासमोर धरणे अन 11 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
या आंदोलनाला सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, लता गायकवाड यांनी हजेरी लावत जाहीर पाठिंबा दिला यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते.
या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.पी.बेलकर, उपाध्यक्ष गोविंद गर्जे, सचिव अंकुश पवार, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर राठोड, नायगाव तालुकाध्यक्ष रामकृष्ण मोरे, हणमंत कोकुर्ले, मालू कांबळे, संभाजी उपासे, विश्वम्भर शिंदे, बापूराव शिंदे, किरण शिंदे, गजानन हेंडगे, चंपती जाधव, सारंगे ओंकार, कसेवाड शंकर, अविनाश मानकदुर्गे, माधव वाढे, गंगाधर राठोड, नागेश तीवडे, कैलास चव्हाण, विलास वाघमारे, गोविंद गायकवाड, बालाजी राठोड, योगेश राठोड, लक्ष्मी शैलेवाड, विशाखा भरणे, अर्चना गुंडेकर, मिना आरशे, सुकेशना हट्टे, मुनीर पठाण, महेंद्र कांबळे आदी संगणक परिचालक उपस्थित होते.
संगणक परिचालक हा डिजिटल इंडियाचा खरा मानकरी आहे पण त्यांच्या प्रश्नाकडे शासनाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत मार्फत तेरा हजार चारशे पन्नास रुपये घेऊन केवळ सात हजार रुपये असे माफक मासिक वेतन संगणक परिचालक यांना दिले जात आहे. कंपनीने लाखो- करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. कंपनी तुपाशी अन संगणक परिचालक उपाशी अशी अवस्था झाली आहे. या सर्वावर आळा घालून आम्हाला आकृती बंधात समाविष्ट करावे अन आकृतीबंधाला वेळ लागत असेल तर कमीत कमी वीस हजार मानधन देण्यात यावे.एस. पी. बेलकरजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (रजि. NGP/5768)
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा