maharashtra day, workers day, shivshahi news,

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला

वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी घेतला निर्णय
The youth of the police force gave the first salary to the Gopinath Munde Foundation, Decision taken to save Vaidyanath sugar factory, pankaja mundhe, beed, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव मधील तरुणाने आपला पहिला पगार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला दिला असून वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सध्या या कारखान्याला सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जवळपास ७ कोटी रुपये मदत आली असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर अंगांचे कातडे जरी सोलून दिले तरी मुंडे साहेबांचे उपकार फिटणार नाही असे मदत दिलेल्या तरुणाने म्हटले आहे.
साठेगाव ता. सिंदखेड राजा मधील नव्याने मुंबई शहर पोलीस दलात रुजू झालेला  युवराज नागरे  या तरुणाने आपला पहिला पगार वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडे धनादेशाद्वारे दिला ,  सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात तो धनादेश  ॲड.सचिन  आंधळे व समस्त  ग्रामस्थ मंडळी साठेगाव ता. सिंदखेड राजा  यांच्या हस्ते  पंकजा ताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !