शासनाचे 76 लाख रुपयांचे नुकसान केल्याचे प्रकरण
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये विविध साहित्य सामग्री खरेदी प्रक्रियेत सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी संबंधित वितरका सोबत आर्थिक व्यवहार करून शासनाचे जवळपास 76 लाख रुपयांचे नुकसान केल्याचे संयुक्त चौकशी दरम्यान सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांना पाठीशी घालून त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे विरोधात निलंबनाच्या कार्यवाहीसह फौजदारी गुन्हे दाखल केले मात्र यातील मुख्य घोटाळेबाज अद्यापही सही सलामत असून त्यांचे विरोधात दोषारोप पत्र एक ते चार बजावूनही त्यांचे विरोधातील सर्व कागदपत्रे लाल फित शाहीत अडकल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 23 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर राठोड यांचे विरोधात कार्यवाहीसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
सिंदखेड राजा येथे कार्यरत असलेले तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये ठिबक, तुषार साहित्य प्रक्रियेमध्ये अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या संगणमताने संबंधित वितरकाकडे आर्थिक हित जोपासत, शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी, शासनाच्या कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीचा पाठपुरावा केला होता. चौकशी अंति 76 लाख रुपयांचा, भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल, जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांनी शासनाकडे सादर करून, या प्रकरणात जे अधिकारी कर्मचारी व वितरक दोषी आहेत, त्यांचे विरुद्ध कारवायाची शिफारस करण्यात आली होती, या अहवालावरून कार्यालयातील पाच कर्मचारी यांचे विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली, आणि वितरकाचे विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीमध्ये निलंबन झालेले पाचही कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या पाचही कर्मचाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र हे होत असताना तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड हेही तेवढेच दोषी असताना, शासन स्तरावरून त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात आला, त्यांचे विरोधात केवळ दोषारोप पत्र एक ते चार बजावण्यात आले, मात्र कार्यवाही शून्य त्यामुळे चंद्रकांत खरात यांनी, वसंत राठोड यांच्यावर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून, मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे, उपोषणाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा