एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा, (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
महात्मा गांधी यांनी आपले देशाला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांची जयंती २ आक्टोबरला असुन त्यानिमित्त एक दिवस अगोदर दि.१ आक्टोबर रोजी एक तास स्वच्छता अभियान राबविणेबाबत देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना आवाहन केले होते. पंतप्रधानानी स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या आवाहनास अनुसरुन रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन श्री.शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमन श्री.तानाजीभाऊ खरात यांचे सुचनेनुसार स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमा अंतर्गत कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी यांनी संपुर्ण कारखाना परिसर साफसफाई करुन स्वच्छ केला. सदर प्रसंगी कार्यकारी संचालक श्री.रमेश जायभाय यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगुन महात्मा गांधी याना आदरांजली अर्पण केली. या स्वच्छता अभियानामध्ये कारखान्याचे शेती अधिकारी श्री. कृष्णात ठवरे, वर्क्स मॅनेजर श्री.परमेश्वर आसबे, चिफ अकौंटंट श्री.रमेश गणेशकर, कार्यालय अधिक्षक श्री. दगडु फटे, टाईमकिपर श्री.आप्पासाहेब शिनगारे, स्टोअरकिपर श्री.उत्तम भुसे, परचेस ऑफिसर श्री.संदिप इंगोले, केनयार्ड सुपरवायझर श्री.प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, इडीपी मॅनेजर श्री.मनोज चेळेकर यांचेसह कारखान्याचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा