सरपंच गजानन सानप व ग्रामस्थ यांना लेखी आश्वासन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई येथील सरपंच २९ सप्टेंबर पासून ग्राम पंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. दिनांक १ ऑक्टोंबर रोजी सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मधस्तीने उपोषण सोडण्यात आले .
गत ९ महिन्यापासून सरपंच व ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही अपूर्ण रस्ता पूर्ण केला नाही .निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी केली नाही म्हणून त्यांनी उपोषण चालू केले होते .काल संध्याकाळी माजी आमदार तोताराम कायंदे ,माजी आमदार खेडेकर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत उपविभागीय अभियंता बी एस .काबरे कनिष्ठ अभियंता महेश भाले यांनी वागजाई येथील सरपंच गजानन सानप व ग्रामस्थ यांना लेखी आश्वासन दिले.
बांधकाम विभागाने सरपंच यांना दिलेले आश्वासन खालील प्रमाणे जळगाव ते वागजाई हद्दी प्रयंत भूमी अभिलेख जिल्हा परिषद बांधकाम विभाग कडून ई जी एस कडून परवानगी मिळून त्याची मोजणी करून पुढील कार्यवाही करणे जळगाव ते वागजाई फाटा अपूर्ण काम पूर्ण करून साईड पट्टया भरून नाली बांधकाम करणे गावातील डी.पी.पासून नाल्याप्रयंत बांधकाम विभागाच्या रेकॉर्ड प्रमाणे ३० फूट रोड करून नाल्या तयार करून पाणी नाल्यात सोडणे डोंगराळ भागातील नैसर्गिक येणारे पाणी प्रवाह प्रमाणे डिजाइन काम पूर्ण करून काम करून देणे बांधकाम विभागाने साईड ला असलेली झाडे परवानगी घेऊन तोडून देणे संरक्षण भिंतीच्या पाण्याचा प्रवाह सर्वेक्षण करून इतर विभागाकडून माहिती घेऊन माहिती १५ दिवसात सादर होईल अंदाजा पत्रकानुसार काम तयार आहे .असे लेखी आश्वासन बांधकाम विभाग यांनी सरपंच यांना दिले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा