काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर यांनी केली उपोषणकर्त्यांशी चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मेहकर नगरीचे दैवत असलेले शारंगधर बालाजी महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये उघड्यावर होणारी मास विक्री बंद करण्यात यावी तसेच मंदिर तसेच ओलांडेश्र्वर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावे बेकायदेशीर ऑटो स्टँड , इतर वाहनांची होणारी गर्दी या सर्व गोष्टींना आळा घालण्याची मागणी करण्यात आली तसेच महात्मा फुले भाजी मार्केटच्या 5 पैकी 4 गेट वरील अतिक्रमण हटवण्यासाठी बालाजी मंदिराचे विश्वस्त व भक्तगण या उपोषणात सहभागी झाले आहे. या आधी निवेदन देऊन देखील नगरपरिषदेने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने उपोषणाचा पवित्रा घेतला असल्याचे समजते आज काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत चर्चा केली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा