दोन गटात विभाजन होऊन सदस्य गेले सहलीवर
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
दुसरबीड ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादीचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनलची सत्ता आहे दुसरबीड चे जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे, पंचायत समिती माजी सभापती विलासराव देशमुख राष्ट्रवादी अल्पसंख्यांक नेते इरफान अली शेख यांनी पॅनलचे नेतृत्व करत १७ पैकी १३ सदस्य निवडून आणले होते.
तसेच विरोधी ग्रामविकास आघाडी दुसरबीड चे नेतृत्व करत वैभव देशमुख यांनी ४ सदस्य निवडून आणले होते काही काळानंतर दुसरबीड ग्रामविकास आघाडीच्या एका सदस्यपतीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता यामध्ये विलासराव देशमुख व इरफान अली यांच्या गटामध्ये ९ सदस्य असल्याची माहिती आहे लोकप्रतिनिधी मध्येच एकमत राहिले नसल्याने गावाचा विकास देखील रखडला आहे आता सरपंच ज्योती प्रकाश सांगळे कधी राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा