maharashtra day, workers day, shivshahi news,

उज्वल भारत देशाच्या परिवर्तनशील प्रतिमेसाठी स्वच्छतेचा जागर अभियान गरजेचे - युवक नेते सोमनाथ आवताडे

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान
Cleaning is a service , Youth leader Somnath Awatade , Pandharpur , Mangalvedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
उज्वल भारत देशाच्या सर्वांगीण परिवर्तनशील कांगोऱ्याचे कोरम पूर्ण करून नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छतेचा जागर हे अभियान नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-  मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते तथा माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी व्यक्त केले आहे. स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत एक तारीख एक तास या अनोख्या उपक्रमामध्ये  आवताडे यांनी स्थानिक नागरिकांसमवेत व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर शहरातील स्वच्छता करुन सदर मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. 


 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छतेसाठी श्रमदान करुन आपला गाव, शहर व परिसर सुजलाम-सुफलाम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालणाऱ्या स्वच्छतेचा जागर अधिक व्यापक पद्धतीने आत्मसात करण्यासाठी एक तारीख एक तास हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


या अभियान प्रसंगी पंढरपूर अर्बन मर्चंन्ट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले, माजी नगरसेवक लक्ष्मण तात्या शिरसट, डी.राज सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष, अनिल अभंगराव सर, सुरेश खिस्ते, आबासाहेब पाटील, बादलसिंह ठाकुर, नितीन करंडे, भास्कर तात्या जगताप, प्रशांत सापनेकर, प्रवीण पिसाळ, राहुल गावडे, पांडुरंग वाडेकर, शंभूराजे सगरे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांचेसह नगरपालिकेचे सर्व अधिकारी व विविध सामाजिक संस्था अधिकारी,पदाधिकारी महिला स्वयंसेवक भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !