सुदैवाने वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी नाही
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
समृध्दी महामार्गावर सिंध ट्रॅव्हल्स बस क्र एम एच ३७.टी.५४५४ अमरावती ते पुणे जात असताना अचानक ट्रॅव्हल्स मधील एसी वायरिंग चे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या ट्रॅव्हल्स मध्ये लागलेली आग Q R V टीमच्या मदतीने विझवण्यात आली असून ट्रॅव्हल्स मध्ये असलेले एकूण 30 प्रवासी व दोन ड्रायव्हर यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. वाहन रोडच्या बाजूला उभे असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. चालक शेख रज्जाक शेख आयुब राहणार धारवा, मंगरूळपीर, जिल्हा वाशिम व चालक प्रवीण मुंडे राहणार मंगरूळपीर जिल्हा वाशिम हे दोन चालक ड्युटीवर होते.
आग लागलेली लगेच लक्षात आल्याने बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तात्काळ प्रतिसाद वाहनाला प्राचारण करण्यात आले. त्यांनी तातडीने आज विझवली. त्यानंतर ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून ट्रॅव्हल क्रमांक ऐ आर ११ऐ८८११ मध्ये बसवून रवाना करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा