सहकाराचे ब्रीद पक्के करण्यासाठी हातात हात घालूण काम करा - प्रवीण गीते
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था र न 138 च्या सन 2022-23 च्या 53 वा वार्षिक अहवाल सादर करताना सहकारी पतसंस्था व बँका कर्जातून संपूर्ण मुक्त होऊन स्वतःच्या पायावर उभी आहे. निवडणुकीनंतर मागील पाच महिन्यात सभासदांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊन मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार एक कोटी दोन लक्ष पेक्षा अधिक नफा होऊन थकीत कर्जावर अधिक भर देऊन एनपीए मध्ये गेलेले खाते नियमित करण्याचा प्रयत्न करीत,संस्थेला अधिक उंचीवर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.
त्या साठी सर्वांच्या हातात हात घालून,सहकाराचे ब्रीद पक्के करण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण गीते यांनी केले. याविषयी अधिक ची माहिती देताना संस्थेचे मानद सचिव विजय तांदूळकर यांनी बोलताना असे सांगितले की सर्व सभासद व संचालक मंडळाच्या सहकार्य शिवाय कोणतीही संस्था यशाच्या शिखरावर आरुढ होऊ शकत नाही. सभासदांच्या हिताच्या योजना राबविण्यात काही कठोर उपाययोजना कराव्या लागतात. सर्वांच्या सहकार्यामुळेच आपली संस्था भरीव यश संपादक करू शकली. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण कर्ज मर्यादा सहा लाख रुपये वरून साडेसात लक्ष रुपये करण्यात आली. तसेच उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा सहा लक्ष रुपयावरून साडेसात लक्ष रुपयापर्यंत करण्यात आली. यासोबतच निगडीची कर्ज मर्यादा तीस हजारावरून वरून पन्नास हजार रुपये करण्यात आली.
सभेने सर्वानुमते यास मंजुरात प्रदान केली आहे. निकडी कर्जावरील व्याजदर दहा टक्के तर सर्वसाधारण कर्जावरील व्याज अकरा टक्के करण्यात आलेले आहे. उच्च शिक्षणावरील कर्जा साठी व्याजदर आठ टक्के कायम ठेवण्यात आलेला आहे.यासोबतच संस्थेची भाग भांडवलात वाढ करण्यासाठी मासिक वर्गणी पाचशे रुपयावरून एक हजार रुपये करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी टाळ्याच्या गजरात या सर्व विषयाला अनुमती प्रदान केली. याप्रसंगी श्री गजानन दादा पाटोळे व श्री सुभाष सुतार यांचा सेवानिवृत्तीच्या पित्यर्थ सत्कार करण्यात आला.
यावेळी जि प कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वाईंदेशकर माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव खेडेकर,सुरेश दादा वानखेडे माजी संचालक,संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मापारी,सहसचिव नरेंद्र मेंतकर,राहुल कासारे,महादेव सोनुने,अनिल खेडेकर,प्रमोद डांगे,सौ सुनीताताई चित्ते(रिंढे)सौ विजयाताई सोनुने(हिंगे) श्रीमती प्रीतीताई पाटील, श्री सुनील लोखंडे, प्रदीप मेथे, विष्णू लहासे ,प्रदीप सपकाळ,मुन्ना यादव श्रीमती संगीता घोंगे, श्रीमती मयुरी सोनवणे, श्रीमती प्रभावती करे,श्रीमती भुसारी, सुधीर तांदूळकर,जगदीश पळसकर,अनिल सुसर सुभाष थोबाळे,सुधीर तोमर, आरोग्य संघटनेचे अनिल लोखंडे, जी एस ठाकूर,विजय गोसावी,सरदारसिंग बरेला,गजानन वाकडे,गणेश भंडारे,इरफान शेख, शेख हसन,संजय धनोकार,जि एस घुबे,सपकाळ,मनोज गवई,प्रवीण गायकवाड,संदीप रिंढे,शिवहरी रिंढे,पवन वाघमारे,राजेश चव्हाण,डोंगरसिंग गायकवाड, सुधाकर घाटे,भागवत बळी,संजय सोनुने,यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक विजय सोनुने,रमेश गाडेकर,गोपाल सोनोने,कैलास जाधव,विष्णू काळदाते व असंख्य सभासद उपस्थित होते सभेचे संचालन व प्रास्ताविक मानद सचिव विजय तांदूळकर यांनी तर आभार प्रदर्शन राहुल कासारे ,संचालक यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा