सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष इसाक कुरैशी यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
महाराष्ट्र राज्यातील खाटीक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्था च्या वतीने माजी अल्पसंख्यक आयोग अध्यक्ष तथा खाटीक समाज राज्य अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे दि.१६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे येथे होणार असून बुलढाणा जिल्हातील हजारो कुरैशी बांधवांनी यात सहभागी व्हावे असे अवाहन सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष इसाक कुरैशी यांनी केले आहे.
राज्यात खाटीक समाजाचे अनेक प्रश्न निर्माणझालेले असून खाटीक समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या सर्व क्षेत्रा मध्ये पहिल्या क्रमांकवर घेवून जायेचे आहे. त्यासाठी मुंबई येथील रंगशारदा सभागृह वांद्रे येथे खाटीक समाजाचे राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच खाटीक समाजाला एका स्टेजवर आणुन एकता अखंडा सामाज बळकट करण्यासाठी राज्य अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी पुढाकार घेतलेले असून त्यांचे हात बळकट करुन खाटीक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बुलढाणा जिल्हातील हजारो कुरैशी बांधवांनी यात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे अवाहन इसाक कुरैशी यांनी केले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा