धनगर समाज बांधवांकडून मोठा प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण देऊन तात्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी नरसी येथील मुख्य चौकात धनगर समाजाच्या वतिने चक्का जाम अंदोलन दि.३० सप्टेंबर २०२३ रोजी सकळी १० वाजता करण्यात आले.
या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देवून जोरदार घोषणाबाजी केली .
एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे , मेंढपाळांना वन संरक्षण कायदा मंजूर करून प्रत्येक जिल्ह्यात 1000 हेक्टर वन जमीन उपलब्ध करून द्यावे , धनगर समाजासाठीचे 1000 कोटी व शेळी मेंढी कर्जाकरिता दहा हजार कोटी भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे , आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले . या मोर्चामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे , सूर्याजी पाटील चाडकर , संजय पाटील चोंडे , माधवराव चिंतले , बालाजी लव्हाळे , साहेबराव चट्टे , दिगंबर पिंपळे , माधव डोणगावे यांसह नरसी , नायगांव , कोकलेगाव , कुंटूर , चारवाडी , परडवाडी , शेळगावछत्री , मरवाळी , मुगाव , धानोरा , टाकळी आदी गावचे शेकडो सकल धनगर समाज बांधव सामील झाले होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा