माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मागणीला यश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
भिमानदीमध्ये सध्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. हेपाणी पुढीलकाळात उपलब्धतेसाठी भिमा नदीवरील बंधाऱ्याला दरवाजे टाकून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करावा, जेणेकरून पुढील काळात पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहिल, याबाबत तत्काळ निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याबाबत पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेत भिमा नदीवरील सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरून घ्यावेत असे आदेश दिले.
पंढरपूर-मंगळवेढा-सांगोला शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा भिमा नदीवर अवलंबून आहेत. मागील काही दिवसापासून पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील पिण्याचा पाणीपुरवठा एक-दोन दिवसाआड करणेत आला होता. त्यामुळे जनता हैराण झाली होती.सध्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोलापूर, पंढरपूर शहराला पिण्यासाठी तसेच भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.जिल्ह्यात भीमा नदीच्या पात्रावर ऊस क्षेत्र, द्राक्ष, डाळींब इत्यादी फळबागाची शेती अवलंबुन असल्याने व याभागात समाधानकारक पाऊस नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी व सामान्य शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन पावसाळ्यात पाण्या अभावी पिकाची होरपळ होत आहे. त्यामुळे भिमा नदीवरील सर्व बंधारे पुर्णक्षमतेने व दरवाजे टाकून भरून घ्यावे अशी मागणी पालकमंत्री महोदय यांच्याकडे केली होती. त्यास पालक मंत्री महोदयांनी तातडीने आदेश दिल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा