टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठानने दिली सखोल माहिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन , जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग नांदेड व टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज पाटील होटाळकर यांचे मिलिनियंम पब्लिक स्कुल नायगाव येथे दिनांक २९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण गटविकास अधिकारी वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे.
आयोजित जल जीवन मिशन प्रशिक्षणामध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, आय.सी.आर.पि.अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगट प्रतिनिधी व जलसुरक्षक , प्रतिगाव पाच प्रशिक्षार्थी बोलावण्यात आले होते दिनांक २९ सप्टेंबर २३ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम गटविकास अधिकारी वाजे यांचया मार्गदशनाखाली संपन्न झाला.
प्रशिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आतर. तर प्रशिक्षणा दरम्यान चहापाण्याची सोय व उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, प्रशिक्षणार्थींना ट्रेनिंग किट देण्यात आल्या. या दोन दिवशीय प्रशिक्षणांमध्ये जल जीवन मिशन प्रकल्पाचा उद्देश, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांची भूमिका व जबाबदारी आणि प्रकल्पाची अंमलबजावणी देखभाल व दुरुस्ती प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित व शाश्वत ५५ लिटर पाणी देण्याचे अनुषंगाने शासन ,स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मुख्य भूमिका इत्यादी विषयांचे सत्राद्वारे प्रशिक्षण संस्थेचे मास्टर ट्रेनर यांच्याकडून देण्यात आले. जलजीवन मिशन हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी नळाद्वारे नियमित उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील गटविकास अधिकारी वाजे , पंचायत समिती, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष नांदेड चे एचआरडी मानवतकर व तसेच संबंधित बीआरसी यांनी वेळोवेळी कार्यक्रमास भेटी देऊन कार्यक्रमाची व्यवस्थापन व गुणवत्ता तपासली आणि प्रशिक्षणार्थींना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. नायगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थींनी मोलाचा प्रतिसाद दिला, ज्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत गावात होणाऱ्या पाणी पुरवठा योजना आता यशस्वीरित्या राबवण्यास आता मदत होणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाळकर माजी शिक्षण सभापती जि.प.नांदेड, गटविकास अधिकारी एल आर वाजे , विस्तार अधिकारी जी.बी.कानोडे ,दत्ता इंदूरकर गट समन्वयक (SBM), टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठान चे ट्रेनिंग ईंचार्ज कल्पना कुलकर्णी म्याडम , सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पा.बेंद्रीकर , जिल्हाउपाध्यक्ष माधव कोलगाने आदी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच प्रशिक्षणाची व्यवस्था व गुणवत्तेची प्रशंसा केली.
वरील प्रशिक्षण वेगवेगळ्या बॅच द्वारे विविध सत्रांमध्ये पीपीटी च्या माध्यमातून व खेळांच्या माध्यमातून आणि संबंधित उदाहरणांच्या व ट्रेनिंग ईंचार्ज कल्पना कुलकर्णी म्याडम यांच्या माध्यमातून केआरसी संस्थेचे प्रशिक्षक यांच्याद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा