maharashtra day, workers day, shivshahi news,

एक तारीख-एक तास स्वच्छतेसाठीया मोहिमेला बेटमोगरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायतीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग तर मुख्याध्यापक वाय.डी.भैरवाड यांची दांडी
A date—an hour for cleanliness, narendra modi, betmogara, naigaon, nanded, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तालुक्यातील येथील ग्राम पंचायतीच्या वतीने "एक तारीख-एक तास स्वच्छतेसाठी " या मोहिमेअंतर्गत बेटमोगरा गावातील ठिकठिकाणी साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती अगोदर म्हणजेच १ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या अनुषंगाने मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.१ ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीच्या वतीने "एक तारीख-एक तास स्वच्छतेसाठी" या मोहिमेअंतर्गत गावातील बसस्थानक, जिल्हा परिषद शाळा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र,अंगणवाडी,मुख्य रस्ता,बाजारपेठ,ग्राम.पंचायत परिसर व सार्वजनिक ठिकाणात साफसफाई करून गावात स्वच्छता अभियान राबवित श्रमदान करण्यात आले.
यावेळी, सरपंच नय्युम दफेदार, उपसरपंच ज्ञानेश्वर तळणे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम, सुरेश जाधव स.शि जांभळी,चिनू पाटील,जि.प.शिक्षक एकनाथ बतकुलवार,आनंद गायकवाड,किरणकुमार पाटील,जयकुमार बोंतापल्ले,पत्रकार मुस्तफा पिंजारी, शिवाजी यरपलवाड, तंटामुक्त अध्यक्ष महाजन ढेकळे,बळिराम नवले,मौला मामा, अंगणवाडी सेविका विजया माळगे, लक्ष्मीबाई ढेकळे, ज्योती कांबळे, लक्ष्मीबाई तोटरे,शिवकांता झमपलवाड,फातिमा बी शेख सह बचत गटाचे सदस्य, ग्राम पं. सदस्य, महिला व तरुण युवकांसोबत ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छता मोहिमेला जि.प. हायस्कुलच्या मुख्याध्यापकाची दांडी एक तारीख - एक तास स्वच्छतेसाठी" या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुखेड पं.समीतीचे गटविकास अधिकारी वर्ग-१ यांनी तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीसह शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेशित केले. तसेच या मोहिमेसाठी बेटमोगरा संपर्क अधिकारी म्हणून जि.प.हायस्कुलचे मुख्याध्यापक वाय.डी.भैरवाड यांची नियुक्ती केली होती. मात्र मुख्याध्यापक वाय.डी.भैरवाड यांनीच कामचुकारपणा करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशालाच वेशीवर टांगून स्वच्छता मोहिमेला दांडी मारल्याने ग्राम पंचायतीसह गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !