नायगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
शिवशाही वृत्तसेवा नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मौजे कांडाळा येथे गावकऱ्यांनी आम्ही सर्व खालील सही करणारे कांडाळा ग्रामपंचायत येथील सर्व असून जोपर्यंत मराठा समाजाला 50 टक्के सरकार ओबीसी आरक्षण मिळवून देणार नाही तो पर्यंत कांडाळा गावात आजी माजी आमदार,खासदार,जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य,नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी यांना गावात प्रवेश बंदी राहील आल्यास स्वतः ची जबाबदारी स्वतःवर राहील व आरक्षण मिळेपर्यंत इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार राहील आणि आज रोजी जरांगे पाटील बसलेल्या उपोषणास पाठिंबा देत आहेत.
आसे निवेदनात नमुद केलेले निवेदन दि.२५ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार नायगाव यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर परमेश्वरपा.जाधव,गणेश पा.जाधव,गंजानन पा.कदम,साहेबराव पा.कदम,पद्मसिंह पा.कदम,विश्वांभर पा.जाधव,जगन्नाथ पा.जाधव,योगेश पा.जाधव,सचिन पा.कदम,साईनाथ जाधव,विलास कदम,विजय कदम,कैलास कदम, विश्वनाथ कदम,निखिल कदम, श्रीनिवास जाधव,सुभाष जाधव, बालाजी कदम,संतोष जाधव,सुनील जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा