मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कूटिबींयाना मदत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या नायगाव तालुक्यातील ओमकार आनंदराव बावणे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपत आमदार राजेश पवार यांनी एक लक्ष रूपायाची अर्थीक मदत करून कुटुंबीयांचे सांत्वन करत ओमकारचा छोटा भाऊ सुरज आनंदराव बावणे यांचा पदविपर्यतच्या शिक्षणाचा खर्च उचलणार व बावणे कुटुंबीयांचे सुखदुःखात सदैव सोबत असल्याचे सांगितले.
संपूर्ण राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा विषय सर्वत्र चालु असुन मराठा तरुन मोठ्या प्रमाणात नैराश्याच्या वाटेवर आहेत पण स्वतः चे आयुष संपवुन भावनिक होऊन टोकाचे पाऊल कोणिही उचलु नये सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असुन तरूणाईने कोणतेही चुकीचे पाऊल ऊचलु नये हि विनंती आमदार पवार यांनी केली .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर पाटील भिलवंडे, तालुकाध्यक्ष दता पा ढगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे ,बाबासाहेब पा हंबर्डे, श्रिहरी पा देशमुख , शिवव्याख्याते सोपान कदम, सचिन पाटील टाकळीकर, शिवा पाटील गडगेकर ,सुनिल पाटील शिंदे, परमेश्वर पा कदम, रामेश्वर पा जाधव, साईनाथ पा हेंडगे, नामदेव पा शिंदे, पंढरी पाटील डाकोरे धनंजय पा जाधव, रामदास पाटील ,अमोल पा केरले, सुदर्शन देशमुख,राजु बेळगे ,विजय मलदोडे स्वप्निल पा बावणे, रमाकांत सुर्यवंशी,माधव कोरे, जगन्नाथ पा.बावणे,भोपाळचे सरपंच प्रतिनिधी राठोड, सामाजिक कार्यकर्ते संतोष पा.बावणे, हनुमंत बावणे,भाऊसाहेब बावणे,प्रकाश हेडगे,,पाडुरंग बागडे,साई बावणे सह गावातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा