सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थळाची पुरातत्व विभागाकडून दुरुस्ती सुरू
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे
सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाला(घुमट)भारतीय पुरातत्व विभागाकडून रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरातील एखाद्या ऐतिहासिक वास्तूला रासायनिक प्रक्रिया केली जाण्याची ही पहिलीच घटना आहे. माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ आणि राजे लखुजीराव जाधव यांचा सुभा असलेल्या या शहरात अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील चार महत्त्वाच्या वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातंर्गत येतात तर अन्य वास्तूंचे नियंत्रण हे राज्य पुरातत्व विभागाकडे आहे.वास्तूंची दुरवस्था शहरातील जवळपास सर्वच ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे.
यातील माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राजवाडा सुस्थितीत असला तरीही यात अनेक सुविधांचा अभाव असल्याने येथे येणारे पर्यटक, इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी नाराज होतात. राज्य पुरातत्व विभागाने या विषयाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. अन्य वास्तूत येथील पुतळा बारव आकर्षक पुतळ्याची बनवलेली वास्तू आहे. मात्र सद्या ही वास्तू अखेरच्या घटका मोजत आहे. श्री रामेश्वर मंदिर हे हेमाडपंथी वास्तू कलेचा उत्तम नमुना असेल तरीही भारतीय पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने वास्तूला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. रंग महाल, काळा कोट, चांदणी व मोती तलाव, नीलकंठेश्वर मंदिर, पुष्करणी बारव अशा अनेक वास्तू येथे आहेत.रासायनिक प्रक्रिया दोन ते तीन महिने चालणार घुमट अर्थात राजे लखुजीराव जाधव यांची समाधी १६४०मध्ये बांधून तयार झालेली भारतातील हिंदू राजाची सर्वातमोठी समाधी आहे.
या समाधीचा दगड हा "बेसॉल्ट" प्रकारातील आहे. जास्त टणक नसलेला हा दगड उन, वारा, पावसाने काहीसा खराब होत चाललं होता अनेक वेळा मागणी झाल्याने अखेर या दगडावर आतून, बाहेरून रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास २६ लाख रुपयांचा खर्च केला जाईल. आवश्यक त्या ठिकाणी वज्र लेप व रसायन वापरून त्याला पडलेल्या खाचा किंवा पोपडे पडलेल्या जागा भरण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे समाधी स्थळाचा रंग काहीसा बदलणार असला तरीही याचे आयुष्य वाढण्यात मदत होईल. पुढील सात ते आठ वर्ष या वास्तूला रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम पडणार नाही असे सांगण्यात आले आहे.---------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा