मुलींचा जन्मदर वाढवा
शिवशाही वृत्तसेवा , बूलडाणा जिल्हा प्रतिनिधी, प्रतिक सोनपसारे
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जिल्हा दक्षता समिती सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डॉ. पाटील यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यामध्ये पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना खबऱ्या योजनेंतर्गत शासनाकडुन एक लाख रुपये बक्षिस दिले जातात. या योजनेची सर्वसामान्यपर्यंत जनजागृती करावी. तसेच स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, नेहरु युवा केंद्र, एनएसएस, महिला बाल विकास कार्यालय, व्यसनमुक्ती केंद्र या सर्व यंत्रणानी एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन करावे.जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा