ग्रामीण भागात भाजपची ताकत वाढणार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील हुस्सा या गावचे रहिवासी, भाजपा आमदार राजेश पवार व राजेश देशमुख कुंटुरकर यांचे खंदे समर्थक बाबासाहेब हंबर्डे हुसेकर यांची भाजपच्या नांदेड जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून हंबर्डे यांची चिटणीस पदी वर्णी लागल्याने भाजपची ताकत ग्रामीण भागात वाढणार असे संकेत भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिणचे जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी पदाधिकारी नियुक्त केले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीने हे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाच्या मजबूत संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे. आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू व जिद्दीने ग्रामीण भागात भाजप ची ताकत वाढवण्या साठी कामाला लागू असे हंबर्डे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कुंटूर सर्कलमधील हुस्सा या गावचे रहिवासी, 10 वर्ष सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतिनिधी आसलेले बाबासाहेब हंबर्डे हे माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव कुंटुरकर साहेबांचे अत्यन्त निकट वर्तीय म्हणून ते ओळखले जातात कुंटुरकर साहेबांच्या निधना नंतर ते राजेश कुंटुरकर साहेब यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून भाजप मध्ये काम करीत असतात.या पूर्वी ते युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस होते.आता त्यांच्या कामाची पावती म्हणून भाजप मुख्य कार्यकारिणीत जिल्हा चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा