गणेशोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किनगावराजा पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे दुसरबीड मध्ये दि. २२ सप्टेंबर रोजी पथसंचलन करण्यात आले.
श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले. पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होत असल्याने व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने दुसरबीड येथे किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे उपस्थित होते.
गणेशोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार, गणेश डोईफोडे तसेच पोलीस व होमगार्ड यांनी संपूर्ण दुसरबीड पोलीस चौकी पासून मिरवणूक मार्गवरून सशस्त्र पथ संचलन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा