रात्रीची वेळ असल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
देऊळगावराजा गावातील बस स्टॅन्ड कडून चिखली कडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. हया रस्त्यांना खूप रहदारी असते आणि वर्दळ पाहवयास मिळते. अहिंसा मार्ग ते बालाजी वेस च्या दरम्यान तीन विद्युत खांबावरून त्या भागामध्ये विद्युत पुरवठा केलेला आहे. देऊळगाव राजा येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी रात्रीला एक दीडच्या सुमारास बस स्टॅन्ड कडून चिखली कडे जाणाऱ्या पार्सल वाहक, कंटेनर क्रमांक RJ-14 GQ-2441 या कंटेनरने बुलडाणा अर्बन जवळील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. त्यामुळे पोस्ट ऑफिस समोरील एक खांब व बालाजी वेशी वरील एक खांब असे एकूण तीन खांब पूर्णपणे वाकले आहेत.
तिन्ही खांबावरच्या तार पूर्णपणे रस्त्यावर तुटून पडल्या. ही घटना ड्रायव्हरला डुलकी आल्यामुळे घडली असे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती बुलढाणा अर्बन चे वॉचमन यांनी तात्काळ महावितरणाला दिली. महावितरणाने कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेऊन विद्युत पुरवठा खंडित करून खांब पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साधारणता: महावितरणाचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. रात्रीची वेळ असल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा