एकच ध्यास रस्त्याचे राहिलेले काम पूर्ण करा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
वाघजाई फाटा ते जळगाव रस्त्याचे राहिलेले काम पूर्ण करा या साठी वाघजाई येथील सरपंच व गावकरी यांनी सबंधित बांधकाम विभाग देऊळगाव राजा यांना लेखी निवेदन देऊन तोंडी तक्रार करूनही सबंधित ठेकेदार यांनी काम पूर्ण केले नाही या साठी गावचे सरपंच गजानन सानप व ग्रामस्थ दिनांक २९ सप्टेंबर पासून ग्राम पंचायत कार्यालय समोर उपोषणास बसले आहे .
हा रस्ता सिंदखेड राजा येथे दळणवळना साठी अत्यंत महत्वाचा असून तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे .हा रस्ता डांबरीकर मजबुतीकरण व पुला सह संबंधित विभागाने निविदा प्रक्रियेद्वारे दराडे ठेकेदार यांना दिले आहे . हा रस्ता वाघजाई गावाजवळअत्यंत खराब असून जाणे येणे कठीण झाले आहे .पाण्याची विल्हेवाट लावलेली नाही त्या मुळे गटार निर्माण झाले असून गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे . व गावा समोरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या वरील समस्यांची दखल घेऊन अपूर्ण काम पूर्ण करावे व निकृष्ट कामाची चौकशी करावी असे न झाल्याचं २९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी कळविले होते .
९ दिवस अगोदर कळवून सुद्धा व उपोषणाचा इशारा देऊन ठेकेदार सबंधित विभाग यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता भाले ,ठेकेदार नाथाभाऊ दराडे ,किनगाव राजाचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली . व संबंधित विभागाने सरपंच गजानन सानप व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण सरपंच व त्यांचे सहकारी यांनी काम सुरू करा तेव्हा उपोषण सोडू अशी भूमिका घेतली .या बाबत आमच्या प्रतिनिधीने सरपंच यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की,मी ९ महिन्यापासून या विभागाला लेखी निवेदन दिले.
पण हे अधिकारी आम्हाला उडवा उडवी ची उत्तरे देत असून खोट बोलतात व वेळ मारून नेतात या रस्ता मुळे बरेच अपघात दररोज घडतात ,बऱ्याच जणांना अपंगत्व आले आहे रोगराई पसरत आहे याला जबाबदार संबंधित विभाग व ठेकेदार आहे .जो प्रयंत काम होत नाही तो प्रयंत उपोषण चालू राहणार आहे . या उपोषणास माजी सरपंच लिंबाजी सानप अशोकराव सानप रामकिसन सानप दत्तू सानप मंगेश कोटगिरे राजु सानप सुखदेव झोटे संदीप बोरुडे शिवहरी बोरुडे शरद सानप सचिन सानप भगवान सानप उमेश सानप समाधान सानप राधाकिसन सानप पर्वता सानप संतोष सानप यांनी सहभाग घेतला आहे
भूमिअभिलेख अंतर्गत मोजमाप करून जे अतिक्रमन धारक आहे त्यांचे अतिक्रमण काढून अपूर्ण काम लवकर पूर्ण करणार आहोत .
बी एस काबरे
कार्यकारी अभियंता देऊळगाव राजा
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा