जनतेशी नाळ जुळलेला कृतिशील नेता अशी ओळख
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुनिल तोताराम कायंदे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी एका पत्रकाद्वारे सदर निवड केली आहे. भारतीय जनता पक्ष देशासह राज्यात सत्तेत असेलेला एक पक्ष आहे, येणाऱ्या काळातील निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजकारण गेली तीन दशके कायंदे घरण्याभोवती फिरत आहे त्यादृष्टीने भाजपचा प्रभावी युवा चेहरा व सामान्य जनतेशी नाळ जुळलेला कृतिशील नेता म्हणून डॉ. सुनिल कायंदे यांची ओळख आहे त्यांच्या निवडीने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा